MPSC अंतर्गत 26 पदांन साठी भरती | MPSC भरती 2024.
MPSC अंतर्गत 26 पदांची भरती: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत नवीन पदांची भरती साठी जाहिरात निघाली त्या नुसार सहाय्यक प्राध्यापक, आय सी सी यू औषध वैद्यक शास्त्र, सहाय्यक ग्रंथालय संचालक/ जिल्हा ग्रंथालय अधिकारी , कनिष्ठ तांत्रिक अधिकारी गट- ब उपसंचालक पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरायच्या आहेत. या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 26 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी उमेदवाराचे वय तसेच त्याची शैक्षणिक पात्रता किती हवी याची सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या आणखीन माहिती साठी तुम्ही खालील अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.

MPSC Bharti 2024 : MPSC ( Maharashtra public services commission ) has recently announced new Bharti. For the post of Assistant Professor, Assistant Library Director/District Library Officer, junior Technical Officer, Grup-B Deputy director. There are total post of 26 vacancies available. Interested and eligible candidates send there application form online mode.can apply for application form before the last date. Application will be start from 05 February 2024. And last date for apply is 26 February 2024. More information about the recruitment MPSC Bharti 2024. Visit my website.
MPSC अंतर्गत 26 पदांची भरती ची माहिती पुढील प्रमाणे:
- पद संख्या :- 26
- पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथालय संचालक,/ जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, गट – ब उपसंचालक.
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि प्रतेक पदा नुसार वेगवेगळी आहे. ती खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र
- वायो मर्यादा:- 18 ते 45 वर्ष
- अर्ज फी :- अरखिव ( खुला) 719 ₹ मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग 449 ₹
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख 05 फेब्रुवारी 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024.
MPSC अंतर्गत 26 पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव खालील प्रमाणे:
पदाचे नाव | पद संख्या |
साहाय्य प्राध्यापक | 17 |
साहाय्यक ग्रंथालय संचालक / जिल्हा ग्रंथालय अधिकारी | 07 |
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, गट ब | 01 |
उपसंचालक | 01 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
साहाय्यक प्राध्यापक | M.D.- Medicine / M.D – General Medicine / DNB. – Medicine/ General Medicine |
सहाय्यक ग्रंथालय संचालक/ जिल्हा ग्रंथालय अधिकारी | Hold a degree in Arts, Science, Commerce or Law of any statutory University 2) Hold a degree or diploma in library Science of any statutory University 3) possess sound knowledge Marathi. |
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी गट ब | possess a degree in Arts, Science Commerce or Law 2) Are licentiate of the fedretion of insurance institutes. |
उपसंचालक | posses a post – grqduate degree in Geology or Applied Geology of a recognised university or Diploma in Applied Geology of mines, dhanabad or any qualification recognised by Government to be equivalent there to. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
साहाय्यक प्राध्यापक | 57,000/- ते 182,000/- |
सहाय्यक ग्रंथालय संचालक/ जिल्हा ग्रंथालय अधिकारी | 41,800/- ते 1,32,300/- |
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी गट ब | 41,800 ते 1,32,300 |
उपसंचालक | 67,700/- ते 2,08,700 /- |
उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी. या पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा शेवटच्या तारखे आधी करावा नंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. अर्ज मध्ये माहिती अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. आणखीन माहिती साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची अधिकृत वेबसाईट आणि PDF चेक करणे.
MPSC अंतर्गत 26 पदांची भरती ची लिंक पुढील प्रमाणे:
MPSC अंतर्गत 26 पदांची भरती ची PDF पुढील प्रमाणे:
जाहीराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो जेणे करुन त्यांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती बघण्या साठी तुम्ही खालील लिंक वर जाऊन भेट देऊ शकता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) बद्दल थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे:
एमपीएससी (MPSC) चा फुल्ल फॉर्म म्हणजे Mharashtra public services commission महणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे जी परीक्षा घेतली जाते तिला एमपीएससी परीक्षा असे बोल्ले जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हि राज्य घटना कलम 315 अन्वये निर्माण केलेली एक भारतीय सरकारी संस्था आहे. जी संस्था महाराष्ट्र राज्य तील नागरी सेवेतील अधिकारी पदासाठी भरती साठी परीक्षेचे आयोजन करते. त्या नंतर उमेदवारांचे गुणवत्ता आणि राज्याच्या आरक्षणाच्या पूर्व निर्धारित नियमानुसार या पदाची भरती केली जाते. एमपीएससी परीक्षा चे अभ्यासक्रम म्हणजे एमपीएससी परीक्षेचे दोन टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी च मुख्य परीक्षे साठी पात्र समजला जातो.पूर्व परीक्षा मध्ये सामान्य ज्ञान, सामान्य इंग्रजी, सामान्य मराठी, आणि सामान्य अध्ययन या चार विषयावर आधारित पेपर असतात. त्या नंतर मुख्य परीक्षेत सहा पेपर असतात. ज्या मध्ये दोन इंग्रजी आणि मराठी भाषेचे पेपर असतात आणि चार पेपर हे सामान्य अध्ययन चे असतात. ज्या मध्ये इतिहास आणि भूगोल महाराष्ट्र संदर्भात विचारले जाते. भारतीय संविधान तसेच राजकारण, मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क, अर्थ व्यवस्था आणि नियोजन, विकास आणि कृषी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासाचे अर्थ शास्त्र असे विषय त्या मध्ये असतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये ज्या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात त्या पुढील प्रमाणे:
- राज्यसेवा परीक्षा
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा.
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा.
- महाराष्ट्र कृषी सेवा
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्थर व न्याय
- दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा
- सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- सहाय्यक परीक्षा
- लिपीक टंकलेखक परीक्षा.
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सेवेतील राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील वेगवेगळ्या पदा साठी एकच परीक्षा घेतली जाते. त्या मध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या सर्व प्रक्रियेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची निवड केली जाते.राज्यसेवा गट अ व गट ब मध्ये येणारे पद खालील प्रमाणे:
- उपजिल्हाधिकारी ( गट अ)
- पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त ( गट अ)
- सहाय्यक विक्रीकर आयुक्त ( गट अ)
- उपनिबंधक सहकारी संस्था (गट अ)
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी ( गट अ)
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ( गट अ )
- मुख्य अधिकारी नगरपालिका / परिषद,( गट अ )
- अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क ( गट अ )
- तहसीलदार ( गट अ )
- साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ( गट ब)
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ( गट ब)
- कक्ष अधिकारी ( गट ब)
- गट विकास अधिकारी ( गट ब)
- मुख्य अधिकारी नगरपालिका/ नगर परिषद ( गट ब)
- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ( गट ब)
- उपअधीक्षक भूमी अभिलेख ( गट ब)
- साहाय्यक आयुक्त, राज्य सेवा उत्पादन शुल्क ( गट ब)
- नायब तहसीलदार ( गट ब)
एमपीएससी ( महाराष्ट्र लोकसेवा आयोग) चे मुख्य कार्यालय हे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई येथे आहे. महाराष्ट्र सरकारचे सर्व कामकाज हे व्यवस्थित चालण्यासाठी तसेच हे काम सुरळीत होण्यासाठी हा आयोग विविध सरकारी पदासाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून देते. तसेच विविध सेवन मधील पदोन्नती बदल्या व शिस्त भांगाच्या कृत्य अधल्यास अशा विविध गोष्टी साठी सरकारला सल्ला सुधा देते.
या पदासाठी उमेदवाराची पात्रता म्हणजेच उमेदवाराचे वय हे 19 वर्ष पूर्ण हवे तसेच त्याने कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. असा उमेदवार राज्य सेवा परीक्षा देऊ शकतो. खुल्या गटातील उमेदवारांना वयाच्या 38 वर्ष पूर्ण होई पर्यंत राज्यसेवा परीक्षा देता येते.आणि राखीव गटातील उमेदवारांना तर वयाच्या 43 वर्ष पूर्ण होई पर्यंत परीक्षा देता येते. आता राज्य सेवा आयोगाने परीक्षा किती वेळा द्यावी या वर सुधा बंधन घातले आहे. खुल्या प्रवर्गासाठी किमान 6 संधी उपलब्ध, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी संधीची मर्यादा नाही. तर उर्वरित जो मागासवर्गीय साठी किमान 9 संधी ची मर्यादा आहे. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अधिवास प्रमाण पात्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा ही मराठी किंवा इंग्रजी भाषा मधून जरी देता येत असली तरी उमेदवाराला मराठी भाषेचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उमेदवाराने मराठी हा विषय घेतलेला असणे आवश्यक आहे.